न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देण्यात आली.
२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी तसेच याबाबत ते जागरूक व्हावेत यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज माहिती केंद्र आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे महापालिका देखील या प्रदर्शनात सहभागी झाली होती.
यावेळी पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव तसेच पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळेकर, उपआयुक्त त्रिगुण कुलकर्णी, ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य तुषार झेंडे, विकास लेले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी देवेंद्र मोरे, युवराज बराटे, अमित वाघोले, मारुती मारणे, गौरव सुपे, विजय पौल, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा तसेच योजनांची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.















