न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- जनरल स्टोअर्समधुन फिर्यादी अल्पवयीन मुलगी मास्क घेवुन रो हाऊस सोसायटी गेटजवळ आली. त्यावेळी अचानक एक इसम फिर्यादीच्या मागुन आला. त्याने दोन्ही हाताने फिर्यादीचे तोंड दाबले.
सोसायटी गेटच्या आतमध्ये अज्ञात कारणासाठी फिर्यादीस अंधारात घेवुन जात असताना फिर्यादीने विरोध केला. आरोपींच्या ताब्यातुन निसटुन फिर्यादी घरी गेली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून आरोपींनी फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी सायं. ६. ३० ते ६. ४५ च्या दरम्यान बी १०, गणेश किनारा, गणेश नगर, गणपती मंदिरामागे, दापोडी येथे घडला. १४ वर्षीय फिर्यादी मुलीने आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















