- मुलीच्या आईची पोलिसात धाव; आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- बिल्डींगखाली पार्किंगमध्ये फिर्यादी यांची ५ वर्षांची मुलगी सोसीयटीतील इतर लहान मुलांसोबत खेळत होती. फिर्यादीचे पती कंपनीमध्ये कामावर गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मुलास नाश्ता करण्यासाठी आवाज देत होते. परंतु, मुलीचा फिर्यादीला आवाज आला नाही. तेव्हा फिर्यादी खाली पार्किंगमध्ये मुलीस पाहण्यास आले असता, फिर्यादीला मुलगी कोठेही दिसली नाही. तेव्हा फिर्यादी सोसायटीमध्ये तिला शोधत असताना आरोपीच्या फ्लॅटच्या बाहेर फिर्यादीला त्यांच्या मुलीची चप्पल दिसली. तेव्हा फिर्यादीने दरवाजा जोरात वाजवला असता तो आतुन कडी लावून बंद होता.
त्यानंतर काही वेळाने आरोपीने दरवाजा उघडला असता, फिर्यादीला त्यांची मुलगी बेडरूममधुन येताना दिसली. तेव्हा फिर्यादीने मुलीस विचारले ‘ तु बेडरूममध्ये काय करतेस? ‘ तेव्हा आरोपी फिर्यादीला घाबरत म्हटला की, ती खेळत होती. तेव्हा फिर्यादी मुलीस घरी घेऊन आले. मुलीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता मुलीने फिर्यादीस सांगितले की, ” अंकल मुझे उनके बेडरूम में लेके गए ” तसेच तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. फिर्यादीने पतीला फोनद्वारे झाला प्रकार सांगितला. फिर्यादीने आरोपीला फिर्यादीच्या पतीच्या मित्रासमक्ष जाब विचाराला असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीने फ्लॅटचा दरवाजा लावुन लपुन बसला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४) रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास एक्सरबिया आयफील सिटी बिल्डींग सी-१, फ्लॅट नं ११३ चाकणमध्ये घडली. २५ वर्षीय फिर्यादी महिलेने आरोपी पंकज प्रभाकरराव बाहेकर (वय ४२ वर्षे, रा फ्लॅट नं. ११३, एक्सरबिया आयफील सिटी, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.


















