न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- दुकानाच्या बंद शटरच्या खाली अज्ञात इसमाने जमिनीत खडडा खांदला. त्यावाटे दुकानात प्रवेश करून दुकानातील २,२८,३०६ रुपये किंमतीची मोटार वायडिंगसाठीची कॉपर वायर चोरी करून नेली आहे.
ही घटना (दि २३) रोजी रात्री १२.०० वा. ते (दि. २४) रोजी सकाळी ९.३० वा. विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे चौक ते विशालनगर रोडलगत घडली.
फिर्यादी गोविंद भरत सुरवसे (वय ३८ वर्षे, रा. शिंदेवस्ती, सर्वे नं.४६/४/५, मारूंजी) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















