न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२२) :- काम न मिळाल्याने घरी जात असताना सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादीच्या १५ वर्षीय मुलीचा आरोपीने हात पकडला. ” मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे का नाही, की तुला तुझ्या मामाच्या मुलाशी लग्न करायचे आहे ” असे बोलून फिर्यादीच्या मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २४) रोजी सकाळी १०:०० वा. मराठी शाळेजवळ, मामुर्डी, देहुरोड येथे सार्वजनिक रस्त्यावर घडली. ३८ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी रवी राठोड (रा. शितळानगर, पुर्ण पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















