न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र पोलीस दलाकडून वाहतूक नियमांच्या अनुषंगाने Maha traffic app उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करावे. त्यात मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक आदी माहीती नमूद करावी. या अॅपद्वारे आपल्या वाहनावर किती ई चलन प्रलंबित आहे. आपल्या वाहनांवर कोणत्या ठिकाणी व कोणत्या कलमान्वये ई चलन झाले आहे, याची माहिती मिळते.
या अॅपमध्ये दंड भरण्याची तरतुद करण्यात आली आहे. (कार्ड पेमेंट), दंडाची रक्कम भरली असल्यास त्याचा तपशीलही मिळतो. चुकीचे ई चलन झाले असेल तर आपण अॅप मधील Grievance Option द्वारे तक्रार करू शकता. Information Option द्वारे कोणत्या कलमासाठी किती दंड आहे याची माहीती मिळते. Mahatrafficapp हे Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच युटुब वर अॅप हाताळण्याबाबतचे व्हीडीओज उपलब्ध आहेत.
पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतिश माने म्हणाले, वाहतूक नियमांच्या दृष्टीने खास करून महामार्गावर वेग मर्यादा ओळखणारे स्पीट डीटेक्टीव्ह कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांची बऱ्याच नागरिकांना माहीती नसते. त्यामुळे आपल्या वाहनांवरती अशा प्रकार आपल्या नकळत चलन होतात. तसेच पिंपरी चिंचवड शहरात CCTV बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे कमांडींग रुममधून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारण्यात येतो, याची कल्पना बहूतेक जणांना नसते, त्यामुळे आपल्या नकळत आपल्या वाहनांवर ई चलन झालेले असते. नागरिकांनी Maha traffic app मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये असणाऱ्या सुविधांची माहीती करून घ्यावी. वाहतूक नियमांचे पालन करावे. दंड होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाहनावर पेंडींग चलन असल्यास जवळच्या वाहतूक पोलीसांकडे जावून दंड भरावा. अॅपबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाईन संपर्क क्रमांक ८४४८४४८९६० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















