न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून वारंवार अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येते; मात्र तरीदेखील शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून बांधकामे केली जात आहेत.
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुद्वाराजवळील ओढ्यावर अतिक्रमण केले होते. हे बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत जमीनदोस्त केले. कारवाई वेळी महापालिकेच्या धडक कारवाई पथकाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.















