न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च) :- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात इंदोर यंदा देखील पाहिल्या स्थानावर आहे. तर, यामध्ये गतवर्षी १० व्या स्थानावर असलेले पुणे शहर यंदा ३७ व्या स्थानावर गेले तर, पिंपरी-चिंचवड ५७ व्या स्थानी आहे.
तर मागीलवर्षी पुण्याचा १० वा क्रमांक होता. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरली असल्याचे आकडेवारीवरुन माहिती पुढे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा कचरा होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा आज (बुधवारी) निकाल जाहीर झाला आहे.















