न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ६ मार्च) :- डिसिजन सायन्स संस्था हि शैक्षाणिक, व्यावसायिक व संशोधक तज्ञाची संघटना असलेली जागतिक पातळीवरील संस्था असुन ह्याचे मुख्यालय अटलांटा, अमेरिका येथे आहे. जगभरातील शैक्षाणिक क्षेत्रातील नामवंत लोक हे या संस्थेचे सदस्य आहेत.
अमेरिकेच्या पाच प्रादेशिक विभागातून तसेच युरोप, मेक्सिको, एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात हि संस्था कार्यरत आहे. या डिसिजन सायन्स संस्थेचे संचालक व पदाधिकारी होणेसाठी जागतिक पातळीवर निवडणूक लढविली जाते व हि निवडणूक संचालक व पदाधिकारी यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची मानली जाते. डिसिजन सायन्स संस्थेमध्ये सहा जागा या खूप नामाकिंत असतात आणि त्या जागासाठी जगभरातून संचालक व पदाधिकारी यांच्यासाठी निवडणूक घेतली जाते . या संस्थेच्या उपाध्यक्ष या पदासाठी जागतिक पातळीवरती भारताकडून अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर निवडणुकीसाठी उभे राहिले होते.
डॉ. एकनाथ खेडकर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून चीन देशाचे ट्रीटाश लाओसिरीहौंग्तोंग उभे राहिले होते . या निवडणूकीसाठी एकूण मतदार १३२९ म्हणजेच ५२% इतके मतदान झाले आणि परदेशात या संस्थेमेध्ये चीन देशाचे ट्रीटाश लाओसिरीहौंग्तोंग यांचा दणदणीत पराभव करून भारताचे अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर हे संचालक व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे. डॉ. एकनाथ खेडकर हे तिसरे व्यक्ती ठरले ज्यांनी हा विजय भारताकडे आणून उपाध्यक्षपद (एशिया पेसिफिक विभाग ) हे भारताकडे कायम ठेवले. डॉ. एकनाथ खेडकर हे विजयी होऊन शैक्षाणिक क्षेत्रात भारतासाठी मानाचा तुरा रोवला.
यामुळे भारताला शैक्षाणिक, व्यावसायिक व संशोधन क्षेत्रामध्ये डॉ. एकनाथ खेडकर, कुलगुरू अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ यांच्या माध्यमातून जागतिक नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतातील विद्यापीठामध्ये संशोधन वाढविणे व भारतातील विद्यापीठे पहिल्या पाचशे क्रमवारीत जागतिक पातळीवरती येण्यास डॉ. एकनाथ खेडकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. ह्या यशासाठी जगभरातून, भारतातून व महाराष्ट्रतून अनेक शैक्षाणिक क्षेत्रातून डॉ. एकनाथ खेडकर यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












