न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- कंपनीकडून कंपनीच्या कामासाठी आरोपीला लॅपटॉप व क्रेडीट कार्ड दिले होते. कंपनीने आरोपीला कामावरुन काढले. त्यानंतर देखील आरोपीने कंपनीकडे लॅपटॉप व क्रेडिट कार्ड जमा केला नाही.
क्रेडीट कार्डचा स्वतःसाठी वापर करुन कंपनीची एकुण ३,८८,४०२ रुपयांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि ७/०४/२०२२) रोजी ११.३० वा ते आजपर्यंत इंडिया प्रा.लि. हिंजवडी, फेज. १ येथे घडला.
फिर्यादी संदिप रघुनाथ पाटील (वय ३८ वर्षे, धंदा-नोकरी रा. १३/५, मोरया पार्क, लेन नंबर. १, पिंपरळे गुरव, सांगवी) यांनी आरोपी सिद्धार्थ गायधर पनीग्रही (वय ३५ वर्षे, रा. टियरा अर्पाटमेंट. ब्लॉक बी-१०३, शंकर कलाटेनगर, सयाजी हॉटेल शेजारी, वाकड, मुळगाव-नंबर २५, ४ क्रॉस तिसरा मजला, साईबाबा लेन मरथहल्ली, बेंगलुरु कर्नाटक) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















