न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- किवळेतील मामुर्डी येथील लेखा फार्मजवळ आरोपी हा त्याच्याजवळ विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्टल जिवंत काडतुस बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
देहूरोड पोलिसांनी (दि. १२) रोजी रात्री ९.४५ वा. चे सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५१०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. द्रोन सुनिल मोरे (वय २२ वर्ष रा. श्रीकृष्णनगर एम बी कॅम्प, देहुरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बेकायदेशिररित्या तपकिरी रंगाच्या मातीच्या चिलीममध्ये गांजा भरुन त्यातुन येणारा धुर ओढताना व सेवन करताना आरोपी मिळुन आला. पिंपरी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (दि. १२) रोजी दुपारी ४.०० वा. चे सुमारास पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील सहकारी उपनिबंधक कार्यालयाच्या मागील बाजुस पार्कींगच्या बाजुला असलेल्या संरक्षणी भिंतीच्या कडेला आडोशाला गांजा ओढणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी चेतन मानतेश अलमिल (वय २२ वर्षे रा घर क्र १०२, कुलदिप आंगण सोसायटी, नेहरुगनर, पिंपरी), अमोल दत्ता शिंदे (वय २७ वर्षे, रा बिल्डींग क्र १३, फ्लॅट क्र ३०६, हनुमान हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर, अण्णासाहेब मगर स्टेडीयमचे बाजुला, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी १०० रुपये किंमतीचा ६ ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य किंमत ००-००/- रु. असा एकुण १०० रु.चा माल जप्त केला आहे.