- कासारवाडी, रहाटणी, काळेवाडी, नवी सांगवीतील या शाळांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात ५ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. त्यात ज्ञानराज प्राथमिक शाळा कासारवाडी, मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी, माने इंग्लिश स्कूल, राजवाडेनगर काळेवाडी, काकाज इंटरनॅशनल स्कूल काळेवाडी, होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी या शाळांचा समावेश आहे.
शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केल्यानंतर ५ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा अनधिकृरित्या चालविण्यात येत होत्या. संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले आहेत.
शहरातील या अधिकृ शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील. तसेच संबंधित शाळांनी शासनाची परवानगी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. परवानगीशिवाय शाळा सुरू केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– संजय नाईकडे प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिं.चिं…