न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय फलक, बोर्ड व होर्डिंग तात्काळ उतविण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांना दिले आहेत. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश उपजिल्हाधिकारी अस्मिता गोरे यांनी पालिका उपायुक्त सचिन ढोले यांना सोमवारी (दि.२३) दिले आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २७ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता १८ जानेवारीपासून लागू झाली आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात लागलेले राजकीय फलक, बोर्ड व होर्डिंग तात्काळ काढून घ्यावेत. तसेच, पक्षाचे नामफलकही झाकण्यात यावेत.
आचारसंहिता लागू झालेली असली तरी, चिंचवड मतदारसंघात अनेक ठिकाणी राजकीय फ्लेक्स, होर्डिंग व बोर्ड तसेच, राजकीय पक्षाचे नामफलक पूर्वीप्रमाणे | झळकत असल्याचे चित्र आहे.

















