- प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन प्रसिद्ध उद्योजक लायन रमेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक समवेत शिक्षकेत्तर कर्मचारी ध्वजारोहनासाठी उपस्थित होते.
ध्वजारोहनापूर्वी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषेत डोळ्याचे पारणे फेडणारे पथसंचालन बँड पथकासह करीत उपस्थितांना मानवंदना दिली.
मार्गदर्शन करताना लायन रमेश शहा म्हणाले, भारत देशाला बलशाही करण्यासाठी शिक्षकांनी बदलत्या काळानुसार ज्ञान आत्मसात करून स्वतःला अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत निभाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण शिक्षकांनी देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, देशाचा आदर्श नागरिक भावी काळात होण्यासाठी प्रत्येकाने सर्वांगीण ज्ञान आत्मसात करावे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. ध्येय निश्चिती करून ज्ञान आत्मसात करीत शिक्षण घ्या. शिक्षणाबरोबरच शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी आवडत्या खेळाला विशेष महत्व द्या. त्यामुळे सहनशीलता व वैयक्तिक गुणांचा विकास होतो. लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल हा कानमंत्र विसरू नका. देशाने मला काय दिले. यापेक्षा मी देशासाठी काय करणार हा विचार प्रत्येकाने आत्मसात करून आजच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संकल्प करू या असा संदेश यावेळी दिला. तसेच, लोकशाही संविधानाचा इतिहास यावेळी विस्तृतपणे विशद केला.
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीते, पारंपारिक लोकनृत्य मल्लखांब, कवायत आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस, उपमुख्याध्यापिका लिजा सोजू, क्रीडा शिक्षक मारीआपन मुरलीयार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले. तर ध्वजारोहन कार्यक्रमासाठी क्रिडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड, पांडुरंग इंगळे, शबाना शेख, अक्षय परदेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी चूग यांनी केले. तर, आभार डॉ. सचिन बोरगावे यांनी मानले.