- तथाकथित बँकेच्या अध्यक्षाच्या घराबाहेर पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचा ताफा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- बनावट कागदपत्रे वापरून, कर्ज वाटपच्या चारशे कोटीपेंक्षा अधिकच्या घोटाळ्याप्रकरणी पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीसह इतर संचालकांवर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू असतानाच आज शुक्रवारी (दि. २७) रोजी मुलचंदानी यांच्या घरावर राज्याच्या सक्त वसुली संचालयाने अर्थात ईडीने छापेमारी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय.
मुलचंदानी यांच्या पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत ईडीकडून तपासणी सुरु आहे. तिथे पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचा ताफा तैनात आहे. इमारतीतून कोणालाही बाहेर अथवा आत जाऊ दिले जात नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळू पाहत आहे.