- जियाताई कप; MIDC प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- तीन दिवसीय रंगलेल्या बहुप्रतिष्ठित MIDC प्रीमियर लीग क्रिकेट जियाताई कप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा (दि. २३) रोजी सकाळी ९.०० वाजता चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व क्रिकेट पीचचे पूजन करून पार पडला.
यात १२ कंपन्यांच्या टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. (दि. २३) ६ टीम्स व (दि. २४) दुसऱ्या ६ टीम्स एकमेकांशी भिडल्या. स्पर्धेत एकूण १२ टीम्समधून ८ टीम्स या पूर्व उपांत्य फेरीत पात्र ठरल्या. त्यानंतर उपांत्य फेरीमधून ४ टीम्स या अंतिम फेरीत दाखल झाल्या. अंतिम सामना हा अल्ट्रा टायटन्स विरुद्ध SBR स्ट्रायकर्समध्ये रंगला. यात अल्ट्रा टायटन्सने बाजी मारून अव्वल किताब पटकावला. SBR स्ट्रायकर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या मॅचमध्ये सिद्धकला वॉरियर्स विरुद्ध BSP ब्लास्टर्स हा सामना देखील अतिशय छान रंगला. त्यात BSP ब्लास्टर्सने बाजी मारली.
माजी महापौर योगेश बहल, जेटाई लेझर कंपनीचे हरप्रीत सिंग व त्यांची टीम, अल्ट्रा कॉर्पोरेट कंपनीचे मालक अशोक भोसले, बोडोर लेजरचे पदाधिकारी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नामदेव पोटे, नेत्रा सेल्सचे नितीन खाटेकर, मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
मनोगतात विकासभाऊ साने हे चाकण MIDC उद्योजक संघटना हे अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच घेत असते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सामाजिक कार्यात संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, संचालक प्रवीण शिंदे व संघटनेचा मोलाचा वाटा असतो, असे म्हणाले.
चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेवजी अक्कलकोटे यांनी आपल्या समारोपणाच्या भाषणात, स्पर्धा ही मालक व कर्मचारी यांच्यामधील दरी कमी करण्याकरिता दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो. पुढच्या वेळेला याहून भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही स्पर्धा होणार आहे. योगेश बहल व अल्ट्रा कॉर्पोटेकचे अशोक भोसले यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल व नियोजनाबद्दल कौतुक केले. अशोक भोसले यांनी तिन्ही विजेत्या टीम्स, बेस्ट बॅालर, बेस्ट बॅट्समन, आदी बेस्ट खेळाडूंना लाखो रुपयांचे पारितोषिक दिले. ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात व अतिशय दिमाखात आयोजित केली होती. त्यामुळे सहभागी कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेऊन खेळ खेळत आहोत, असे वाटले.
स्पर्धा आयोजनात मुख्य संयोजक निखिल देशमुख, CA ऋषी खळदकर, प्रवीण शिंदे यांनी सिंहांचा वाटा उचलला.