न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- ‘ एमएसईबी’ मधून बोलत आहे. तुमचे वीजबिल थकले आहे. ते न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्यात येईल, असा आरोपीने फिर्यादीला फोन केला. वीज बिल भरणा करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या बँक खात्याची आरोपीने माहिती घेतली.
फिर्यादीच्या खात्यावरून एक लाख ९४, हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथील शाहूनगर परिसरात (दि. २ ते ७ ऑगस्ट) दरम्यान घडली.
फिर्यादी नारायण जगमोहन महाराणा (वय ३५, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास भिमहतो मंडल (वय २८, रा. कापका, बरकट्टा, जि. हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे.