न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२३) :- रसायनयुक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण झाले आहे. त्यामुळे नदी पात्रात फेसच-फेस दिसत आहे. सोशल मीडियावर इंद्रायणी नदीचा फेसाळलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रामदरी, मोई, मोशी, चिंबळी, डुडूळगाव आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. चिंबळी येथे बंधाऱ्यावरून पाणी पडत असल्याने तिथं काही अंतरावर फेस आढळला आहे.
प्रक्रिया न करिता थेट सांडपाणी सोडल्याने हा फेस होतो, त्यात डिटेर्जेन्ट असते असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. इंद्रायणी प्रदूषणावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीत वारकऱ्यांनी दिला आहे.