न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- बंद घराचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडुन आरोपी चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील लोखंडी व लाकडी कपाटात ठेवलेले १.८ ग्रॅम वजनाचे ३५,००० रुपये किमतीचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व २५,००० रोख रक्कम असा एकुण ६०,००० रुपये किंमतीचा माल चोरुन नेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०) रोजी पहाटे ५.०० वा ते ९.०० वा. दरम्यान सुखवस्तू, बी ५, नर्मदा पार्क, सेक्टर नं २६, प्राधिकरण येथे घडला.
फिर्यादी वामन नरहरि शेळके (वय ६७ वर्षे, माजी सैनिक, रा. प्राधिकरण) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. रावेत पोलिसांनी आरोपी विरोधात ७३/२०२३ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












