- महिलेला काही अंतरावर नेले फरफटत; महिला गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- वाहतुकीच्या नियमांकडे आरोपीने दुर्लक्ष केले. आरोपीच्या ताब्यातील वाहनं हयगयीने, अविचाराने भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवुन सिग्नल तोडला. समोरील टीव्हीएस ज्युपीटर टु व्हीलर गाडी (एमएच १४ जेएस ६३६६) वरील फिर्यादीची पत्नी (वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय) यांना डाव्या बाजुने जोरात धडक दिली. फिर्यादीच्या पत्नीला गाडीसह फरफटत नेत त्यांच्या उजव्या हाताला, डोक्याला, उजव्या कंबरेजवळ, (खुबा) मार लागून जखमी केले. टीव्हीएस ज्युपीटरचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ८) रोजी सकाळी १०.१५ वा सुमारस विश्वशांती कॉलनी, पिके चौक, पिंपळे सौदागर येथे घडला.
फिर्यादी राजेंद्र लक्ष्मण शिंगटे (वय ४२ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. ईक्लेक्टीका होम्स, बी १०६/४०३, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी मारुती सुजुकी स्वीप्ट फोर व्हीलर गाडी एमएच १७ एसजे ४१०३ यावरील चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीविरोधात ४९/ २०२३ भा. द. वी कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, एम. व्हि. अॅक्ट १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.












