- डॉ. आदित्य पतकराव व मित्र परिवारातर्फे पद्मश्री दादा इदाते यांचा सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- केंद्रीय नीती आयोग समिती सदस्य तथा भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांना नुकताच भारत सरकारचा सन्मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल नवी सांगवी येथील आदित्य डेंटल हॉस्पिटल येथे सांगवी मित्र परिवार यांच्या वतीने दादा इदाते यांचा सत्कार करण्यात आला.
या भेटी दरम्यान पद्मश्री दादा इदाते यांनी आदित्य डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य पतकराव यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाल्याबद्दल डॉ. आदित्य यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योजक रघुनाथ जवळकर, अथर्व इदाते, उद्योजक संदीप देसाई, अभिजीत शेलार, बाबा उंडे, विशाल डांगे, नितीन कौल, अरुण मोरे, नितीन पाटिल, डॉ. सौरभ भांडेकर, रणजित कांबळे व इतर सहकारी मित्र उपस्थित होते.












