न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- शहरातील नागरिक, मालमत्ताधारक यांना निवडणूक लढवणे व अन्य कामांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) आवश्यक असतो. तो महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून ऑनलाइन देण्याची सुविधा १ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध करून दिली आहे. www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून नागरिक दाखला मिळवू शकतात.
त्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांना कर संकलन विभागाची एनओसी घेण्यासाठी महापालिका मुख्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांनी फक्त महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरल्यानंतर कर आकारणी व कर संकलन विभागाकडील मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला ऑनलाइन मिळेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.












