न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) : मावळ लोकसभा मतदार संघाची उमेदवारी पार्थ पवार यांना जाहीर झाली आहे. अनेक दिवस उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स संपला असून, आता कार्यकर्त्यांना प्रचार शुभारंभाचे वेध लागले आहेत.
पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार स्वतः फोडणार आहेत. रविवार (दि. १७) रोजी वाल्हेकरवाडीत जाहीर सभा घेऊन पार्थ यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे.











