न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहर मनसेने आक्रमक पवित्रा घेत आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. शहर मनसेचा विस्तार करण्यासाठी शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश घडवून आणला जात आहे.
नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर व पिंपरी चिंचवड विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिन पवार, शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना हेमंत डांगे, विक्रम आडे, तेजस देशपाडे, बिपीन पाल, शुभम महाडिक, ओमकार पाचारणे, श्रीकृष्ण गंगातीर, यश काटे, आकाश आवसरे, अनिकेत वाघमारे आदी उपस्थित होते.











