न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च) :- समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत मंगळवारी (दि. १९) रोजी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, तसेच खासदार अशोक सिद्धार्थ, संदीप रैना, सपाचे प्रदेश उपाध्यक्ष अफजल फारुख, बी.डी. यादव आदी उपस्थित होते.
मावळ लोकसभेची जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला आली असून, त्यानुसार कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली. मावळ लोकसभा मतदार क्षेत्रात औद्योगिक परिसर मोठा असल्याने उत्तर भारतीय समाजाचे वास्तव्य आहे. त्याचा कुरेशी यांच्या उमेदवारीला फायदा होणार आहे.











