न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २१ मार्च) :- वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये धुळवडीनिमित्त सार्वजनिक रस्त्यावर तसेच चौकामध्ये येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांवर रंग टाकणारे. तसेच महिलांच्या अंगावरती रंगाचे फुगे टाकणारे व हल्लडबाजी करणाऱ्या ८४ जणांना आज गुरुवार (दि. २१) रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने अधिक माहिती देताना म्हणाले की, आज धुळवड निमित्त शहरात बंदोबस्त असल्याने हुल्लडबाजी करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार वाकड पोलीस स्टेशनकडील ९ टीममध्ये ७ पोलीस अधिकारी व ७५ कर्मचारी असा फॊजफ़ाटा बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेला होता.
प्रवाशांवरती व महिलांवरती रंग टाकणाऱ्या तसेच वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, असे माने यांनी सांगितले आहे.


















