न्युज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २१ मार्च) :- होळीचा सण म्हणजे जेवणात पुरण पोळी ठरलेलीच. परंतु, समाजात काही लोक असे आहेत त्यांना प्रबळ इच्छा असुनही, या पुरण पोळीचा आस्वाद घेता येत नाही. अश्या आर्थिक कमजोर असलेल्या गरीब लोकांसाठी मधुकर बच्चे युवा मंच व मित्र मंडळीच्या वतीने लोकांकडून पुरण पोळी जमा करून, या सणापासून वंचित राहणाऱ्या गरीब ,गरजू लोकांना पुरण पोळीचे ठीक- ठिकाणी जाऊन वाटप करण्यात आले.
प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमास समाजातील अनेक नागरिक शक्य तेवढी मदत करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरण-पोळ्या जमा झाल्या होत्या. रावेत, निगडी, पिंपरी, चिंचवड, थेरगाव, सांगवी आदी भागात पुरण पोळीचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष:सौरभ शिंदे, पिंपरी चिंचवड केमिस्ट अध्यक्ष संतोष खिंवसरा, सामाजिक कार्यकर्त्या कविता खिंवसरा, प्रभाग अध्यक्ष:गणेश बच्चे आदींनी पुढाकार घेतला. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनीही यात सहभाग नोंदवला.











