न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- पिंपरीतील खराळवाडी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला पहाटे दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीत कागदपत्र जळून खाक झाले असून दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे नुकसान वाढण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी अग्निशमन दलाचे जवान गौतम इंगवले, अमोल चिपळूणकर, विशाल फडतरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.















