न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- इंस्टग्रामवर फेक अकाउंट आय. डी. चा वापर करुन फिर्यादी यांच्या नकळत सोबत काढलेले जुने फोटो पोस्ट केले. ते फोटो फिर्यादी यांचे पती, त्यांचे मित्र व नातेवाईक यांना शेअर केले.
फिर्यादी यांची बदनामी केली. ई सेवा केंद्रात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणुन ‘तु मला ७० हजार दे, नाहीतर तुझे फोटो सर्व ठिकाणी व्हायरल करेन; अशी धमकी आरोपी फिर्यादीला देत आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ०१) रोजीपासुन इंन्स्टग्रामवर अकाउंट आय.डी. kal_yani_211101 वॉट्स अॅपद्वारे घडला आहे. महिला फिर्यादीने आरोपी दिपक लक्ष्मण ठाकुर (रा. अमरनगर, धुळे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४०३/२०२३ भा.द.वि. कलम ३५४ (अ) (३), ३५४ (क), ३५४ (४), ५०६, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















