न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- एकमेकांची ओळख असल्यामुळे आरोपीने फिर्यादीला उसणे १ लाख रुपये दिले होते. ते फिर्यादी यांनी त्याला वेळेवर परत केले नाहीत. ते पैसे परत मिळविण्यासाठी आरोपीने सह आरोपी व इतर दोन अनोळखी इसम यांच्याशी संगणमत केले. फिर्यादीला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवुन त्यांचे अपहरण करुन देहूरोड येथील नदी किनारी नेले. तीथे फिर्यादी यांना हाताने व रॉडने मारहाण केली. पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने फिर्यादी यांना आरोपी यांनी कारमधून रमाबाईनगर, लिंक रोड, पिंपरी येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तीथे आल्यावर आरोपीने फिर्यादी यांच्या भावाला व वडिलांना फोन लावून पैशांची मागणी करून पैसे मिळत नाही तोपर्यंत फिर्यादी यांना फ्लॅटमधील एका रूममध्ये कोंडुन ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०६) रोजी ११.३० च्या सुमारास वाकड ब्रिजच्याखाली, मुंबई बैंगलोर हायवे रोड, वाकड येथे घडला.
फिर्यादी जावेद आरिफ खान (रा. भोसरी, मुळ रा. बुलढाणा) यांनी आरोपी आमान आमिन शेख (वय २१ वर्षे, देहूरोड), रफिकभाई मेहबुब शेख (देहुरोड) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात ४४८/२०२३ भा.वि. कलम ३६५,३४२,३२४,३२३,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















