न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- स्वतःच्या वाहनावरुन घरी येत असताना दुचाकीवरील अनोळखी वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने धोकादायकरित्या दुचाकी चालवुन फिर्यादीच्या वडिलांना जोरात धडक दिली. त्यांना गंभीर जखमी करुन त्यांच्या मृत्युस तसेच स्वतःला जखमी करुन घेण्यास आरोपी दुचाकीचालक कारणीभुत झाला. तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या व स्वतःच्या गाडीचे नुकसान केले.
हा अपघात (दि ०६) रोजी ८.०० वाजेच्या सुमारास तुलसी शाईन सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर भोसरी येथे घडली.
फिर्यादी तुषार प्रल्हाद खेडकर (भोसरी, प्राधिकरण) यांनी आरोपी टु व्हीलर वरील अनोळखी वाहन चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी १९० / २०२३ भा.द.वि. कलम ३०४(अ), ३३७,२७९, ४२७ सह मोवाका कलम ११९/१७७,१८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















