- जबरी चोरी, घरफोडी व गहाळ ६९ मोबाईलसह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२३) :- वाढत्या जबरी चोरी, घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ला ठोस कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. गुन्हयांच्या समांतर तपासा दरम्यान पोलीस पथकास संशयीत व्यक्तींची माहिती मिळाली. संशयावरून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी भोसरी एम.आय.डी.सी अंतर्गत ०७ व सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत ०२ गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडुन पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्हयांतील २३ मोबाईल जप्त करीत एकुण ८ जबरी चोरी व १ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सोमा दुर्गप्पा चौधरी (वय १९ वर्षे, रा. ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी), आदित्य सुरेश कोळी (वय १८ वर्षे, रा ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी) असे अटक आरोपींची नावे आहेत. तसेच एक विधी संघर्षीत बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने चिखली, भोसरी व भोसरी एम. आय. डी पोलीस ठाणे अंतर्गत गहाळ नोंद असलेल्या मोबाईलपैकी ४६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अदयापपर्यंत १८ मोबाईल. मुळ मालकांना परत करण्यात आले असुन उर्वरीत मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्याची कार्यवाही सुरु आहे. या कारवाई दरम्यान विविध कंपनीचे एकुण ६९ मोबाईल असा रु ७,१०,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वपोनि संजय तुंगार (सायबर गुन्हे). पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.
















