न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- देहुरोड पोलीस स्टेशन येथे (दि. ७) रोजी सकाळी ६.०० च्या दरम्यान ६ आणि ८ वर्षांच्या दोन लहान मुलांचे अपहरण झाले आहे, अशी मुलांचे पालक यांनी देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार रजि नं. २७७/२०२३ भादंविक ३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. देहुरोड पोलीसांनी अपहृत बालकांचा २४ तासामध्ये शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरुप दिले आहे.
तपासासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून सर्व पथके बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरात घटनेच्या तपासासाठी पाठविली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे जावुन त्यांचा शोध घेतला. पुणे रेल्वे स्टेशन येथुन २ मुले ही साथी फांऊडेशन यांनी ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपास पथकातील स्टाफने साथी फांऊडेशन, येरवडा येथे संपर्क करून त्यांना याबाबत माहीती दिली. या दोन्ही बालकांना साथी फांऊडेशनच्या ताब्यातुन घेत त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देहुरोड पोलीस स्टेशनकडुन या अपहृत बालकांचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त देहुरोड विभाग पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, दिंगबर सुर्यवंशी पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि दिंगबर अतिग्रे, सहा पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उप-निरीक्षक संदीप बोरकर, पो हवा ५४९ सामील प्रकाश, पो.शि २५०५ शेजाळ, पो शि २९०० कानगुडे, पोशि २४५० माने, पोशि भिसे, पो शि बावनकर यांनी केली आहे.