- चिखलीतील तिघांसह इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- लग्न करण्याचे आमिष दाखवुन आरोपींनी फिर्यादीच्या आई वडिलांचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादी यांना रिसॉर्ट येथे नेऊन फिर्यादीच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शाररीक संबंध ठेवले. तसेच आरोपीच्या आई वडीलांनी फिर्यादीच्या आई वडीलांकडून १६ लाख रुपयाचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने बनवून घेतले. फिर्यादी यांना ते परत न करता त्याचा अपहार केला. तसेच लग्नाची तारीख ठरवली. फिर्यादी यांनी सर्वांचा लग्नात खर्च केल्यानंतर आरोपी यांनी लग्न करणार नसल्याचे सांगुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २८/०५/२०२२ ते दि.१५/०५/२०२३ पर्यंत) आळंदी, ता. खेड. जि. पुणे येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी देविदत्त वसंत भारदे, डॉ. वसंत दत्तात्रय भारदे, महिला आरोपी (रा. चिखली), अमित डहाणे, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी १३०/२०२३ भादिवि कलम ३७६ (२), ४२०, ४०६, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.


















