न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या लोकार्पणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे (दि. १५) रोजी १.३० च्या सुमारास आकुर्डीतील डॉलफिन प्लाझा या सोसायटी समोर येत होते. त्यावेळी फिर्यादी पोलीस शिपाई आणि मपोशि हे आकुर्डीत बंदोबस्तासाठी हजर होते.
दरम्यान व्हिआयपी ताफा आकुर्डीत आला असता त्यावेळी आरोपीने काळ्या रंगाचा टि-शर्ट हातामध्ये घेवून वर हवेत फिरवला. त्यावेळी फिर्यादी पोलिसाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीशी हुज्जत घालत मोठमोठयाने आरडा ओरडा करून फिर्यादी पोलिसांच्या अंगावर येवून फिर्यादीस धक्काबुक्की केली. कॅन्व्हायला आडवा येवून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी १.३० च्या सुमारास डॉलफिन प्लाझा या सोसायटी समोर, आकुर्डी येथे घडली. निगडी पोलीस ठाण्यात ३०७ / २०२३ भा.दं.वि. कलम ३५३,३४१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी गणेश नवनाथ भांडवलकर (अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे पिं. चिं. छावा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.