न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २४ मार्च) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज रविवार (दि. २४) रोजी भोसरी मतदार संघातील निगडी येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या बाईक रॅलीचा शुभारंभ निगडी गावठाणपासून सुरु ते रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली, साने चौक, मोरेवस्ती, फुलेनगर, कृष्णानगर, घरकुल, शरदनगर, कुदळवाडी, जाधववाडी, बो-हाडेवाडी, मोशी, डुडुळगाव, च-होली, दिघी, भोसरी, नेहरुनगर या मार्गावरून अजमेरा येथे रॅलीचा समारोप झाला.
माझ्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी शतशः आभारी आहे. तुमचं मला मिळणार प्रेम आणि तुमचा जल्लोष मला रोज नवीन स्फूर्ती देतो.
– डॉ. अमोल कोल्हे











