न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २४ मार्च) :- निगडी येथील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटमध्ये (आयसीएआय) खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. यावेळी संस्थेतील चार्टर्ड अकाउंटंटशी संवाद साधताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात काही आदिवासी भागात वीज पोहोचली नव्हती. त्या आदिवासी भागात वीज पोहोचवणे अतिशय आव्हानाचे काम होते. अशा प्रकारचे आव्हान स्वीकारून काम करायला मजा येते.
यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, मावळ जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, संस्थेचे अध्यक्ष संतोष संचेती, उपाध्यक्षा सीमरन ललवाणी, सचिव पंकज पाटणी, सचिन बन्सल, शैलेश बोरे, चंद्रकांत काळे, विजयकुमार बाभणे, आनंद जकोटीया, हरीश ललवाणी, संतोष राका आदी उपस्थित होते.











