न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च) :- शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. प्रामुख्याने खासदार श्रीरंग बारणे यांना काही लोकप्रतिनीधींनी एक लाख मतदान पिंपरी विधानसभेतुन मिळणार असल्याची वल्गना केली आहे. परंतु, वरील राजकिय पक्षांची वैयक्तीत ताकत पाहता खासदार श्रीरंग बारणे यांना दिड लाख मतदान आरामात आम्ही सर्वजन मिळवुन देणार आहोत.
गेल्या निवडणुकींचा अहवाल पाहाता राज्यसभा खासदार अमर साबळे यांना पूर्वी पिंपरी विधान सभेतून ६८००० मतदान मिळाले, त्याच्यानंतर भाजपा व आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांना जवळपास ४६००० मतदान मिळाले आहे. कमळ चिन्ह नसताना त्यांना शिलाई मशीन या चिन्हावरवर मतदान मिळाले. पिंपरी विधानसभेत भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासपा तसेच शिवशाही व्यापारीसंघाच्या बरोबर बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेची युवा ताकत पाहता, युतीच्या उमेदवाराला जवळपास दिड लाख मतदानाच्यावर मतदान पिंपरी विधानसभेतुन मिळणार आहे.
तसेच प्रामुख्याने मातंग समाजाचे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदान आहे. त्यात जवळपास तीस हजार मतदान भाजपाचे प्रदेश सदस्य अमित गोरखे व शिवसेना तिरोडा-गोरेगाव मा. विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांचे आहे. तसेच दाखले हे लहुजी शक्तीसेना या मातंग समाज संघटनेच्या शहरप्रमुख पदावर आहेत. तसेच शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रोहीत विभुते या शिवशाही व्यापारीसंघाच्या पदाधिकार्यांच्या सोबतीने वरील आकडेवारी सहज युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मिळणारच, असे भाकीत युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकात वर्तविले आहे.















