- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केला होता उच्च न्यायालयात दावा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२६ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २६ ब मधून निवडून आलेले नगरसेवक तुषार गजानन कामठे यांच्या जात प्रमाणपत्राची तीन महिन्यात फेरतपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.
तुषार कामठे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीत पिंपळे निलख प्रभागातून (प्रभाग क्र. २६ ब) नागरिकांचा मागास प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. त्यासाठी त्यांनी ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र निवडणूक विभागाला सादर केले होते.
त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर सचिन साठे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर साठे यांचे म्हणणे विचारात घेऊन मा. मुंबई उच्च न्यायालयाने तुषार कामठे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी आगामी तीन महिन्यात करण्याचे आदेश पुणे जात पडताळणी समितीला दिले आहेत, अशी माहिती साठे यांनी दिली आहे.










