- यापुढेही अचानक दंडात्मक कारवाई होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्ग, मेन बाजारपेठ आणि भाजी मंडई परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणांवर मंगळवारी (दि. २१) कारवाई करण्यात आली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बाह्यवळण मार्गावरील रस्त्यावर तर मेन बाजारपेठ, नेहरू मंगल कार्यालय आणि भाजी मंडई परिसरात रस्त्यावर असलेले टपऱ्या, पत्रा शेडसह उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई देहूरोड पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी, १२ कर्मचारी आणि लष्कराचे क्यूआरटी पथकाच्या बंदोबस्तात एक टेम्पो वाहन आणि जेसीबीच्या साहाय्याने सुमारे ३० अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. उर्वरित अतिक्रमणधारकावर आठवड्याभरात कारवाई करण्यात येणार आहे.
यापुढे अचानक, अवेळी, कोणतीही सूचना न देता जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणधारकांवर कधीही कारवाई करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती बोर्डाचे राजन सावंत यांनी दिली आहे.












