न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- मोरया अमृततुल्य नावाच्या हॉटेलवर नेहमीप्रमाणे चहा विक्री करीत असताना आरोपी चौघं हातात कोयता व काठी घेवून अल्टो कारमधून आले. फिर्यादीच्या हॉटेलची तोडफोड करून आरडा ओरडा करून दहशत निर्माण केली.
हॉटेलच्या काऊंटरच्या गल्ल्यातील ४००० रूपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. दुकानाची व बाहेरील वाहनाची तोडफोड करून आजुबाजुस दहशत निर्माण करून कारमधून पळुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २४) रोजी ४.३० च्या सुमारास पानसरे मळा, मेदनकरवाडी फाटा, चाकण येथे घडली.
फिर्यादी अथर्व गणेश ताले यांनी आरोपी किशोर ऊर्फ साईनाथ नामदेव कु-हाडे, ओमकार बिसनारे, इतर दोनजण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ५६५ / २०२३ भा.दं.वि कलम ३९२,४२७, ३४ आर्म अॅक्ट ४(२५), फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















