न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- दुसरा विवाह करुन आरोपी वाल्हेकरवाडी येथे एकत्र राहत होते. आरोपीतांनी पैशाच्या कारणावरुन फिर्यादीच्या पतीचा वारंवार शारीरीक व मानसीक छळ करुन त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (जून २०२२ ते २५/०५/२०२३ पर्यंत) सचिन चिंचवडे यांच्या खोलीत वाल्हेकरवाडी, चिंचवड आणि पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर ०१ येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी महिला आरोपी, आदित्य राजगुरु, महिला आरोपी (रा वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २८२ / २०२३ भादवी कलम ३०६, २४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
















