न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- चारचाकी वाहन लावल्यामुळे अडचण झाली आहे, असे फिर्यादीच्या आईने आरोपीला सांगीतले. दरम्यान आरोपीचा मुलगा फिर्यादींच्या आईला उध्दट बोलला. त्याबाबत फिर्यादींनी त्यास विचारणा केली. त्यांचेत धक्काबुक्की झाली. त्याचा राग येवुन आरोपीने फिर्यादीस माझ्या मुलाला हात का लावला, असे म्हणुन त्यांच्या चारचाकी टॅम्पोमध्ये ठेवलेला लोखंडी रॉड काढुन फिर्यादी यांच्या पायावर व डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २४) रोजी रात्री ९:३० च्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथील घराशेजारील मोकळ्या जागेत घडली.
फिर्यादी अंबादास विठठल कानडे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी राम किसन डोईफोडे (भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५३२/२०२३, भा.दं.वि. कलम ३२६,५०४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















