न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- जुन्या मुंबई-पुणे रोडवर एसबीआय बँकेच्या समोर निगडी येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील टँकर एलपीजी गॅस या ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला असताना त्या ज्वालाग्राही पदार्थामुळे जिवितास धोका संभवू शकतो, याची जाणीव असतानासुध्दा तो रस्त्यावर डिवायडर, स्पीड ब्रेकर व सांकेतिक बोर्ड लावलेले असताना विशिष्ठ परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तो अविचाराने हयगयीने भरधाव वेगाने चालवून इतरांच्या जिवीतास धोका निर्माण केला.
रोडच्या कडेला असणाऱ्या डिवायडरला धडक देत टँकर पलटी करून त्या टँकरचे नुकसान करून स्वतः गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५) रोजी रात्री २.४५ च्या सुमारास घडली. निगडी पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्रप्रसाद कुंजलराम यादव (चेंबूर, मुंबई; मुळ उत्तरप्रदेश) याच्या विरोधात ३८१/२०२३ भा. द. वि. कलम-२७९,३३८,२८५,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















