न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- देहूगावात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत श्री क्षेत्र देहूगावला वीजपुरवठा केला जातो. तळवडे या ठिकाणी एकच फीडर बसविण्यात आला आहे. या एकच फीडरवरून अनेक ट्रान्सफरला पुरवठा केला जातो. देहू नगरपंचायत हद्दीत विद्युत ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे देहूगावचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या भागातील अनेक कामे महापालिकेच्या निधीतून केली जातात. चुकीच्या पद्धतीने आराखडे तयार केले जातात. या कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार, वायरमन कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत नाहीत. महापालिकेने ब्लू प्रिंट, नकाशे अद्याप देहू नगरपंचायतीकडे दिलेले नाहीत. आवश्यकतेनुसार केबल आहेत का? ते पाहिले जात नाही. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे, अशी ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.















