न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च) :- काळेवाडी-तापकीरनगर परिसरातील युवा नेते सागर तापकीर यांचा उद्या शुक्रवार (दि. २९) रोजी वाढदिवस आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः चा वाढदिवस अनेक प्रकारच्या झगमगाटात व चमकोगिरीत तसेच उत्साहाच्या भरात साजरा करण्याची नवीन क्रेज युवावर्गात वाढत चालली आहे. मग, वाढदिवस साजरा करताना होणारी पैशांची बरबादी असो की, इतर प्रकारचे कार्यक्रम असोत, याकडे कोणाचेच लक्ष नसते.
परंतु, काळेवाडी-तापकीरनगर परिसरातील युवा नेते सागर तापकीर यांनी मात्र, या अनावश्यक खर्चास फाटा देत आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, समाजातील वंचित, अनाथ व गोर-गरीब घटकांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसेच येथील अनाथ व गोरगरीब घटकास आर्थिक मदत तसेच अन्नदानाचे वाटप करणार आहेत, असे तापकीर यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.











