- अजित पवार यांच्या बंडखोरीवर शरद पवारांचे प्रत्युत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- ‘मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीबाबत संजय राऊतांना सांगितले आहे.
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, असे सांगितले आहे.
शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले ‘मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’ होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही. ”














