न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील सततच्या वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले आहेत. याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी वाहतूक विभागप्रमुख आणि पालिका BRTS अधिकाऱ्यांकडे वाहतूक कोंडीची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
वाहतूक निरीक्षक गोपाल गोकुळे, साळुंखे, BRTS कनिष्ठ अभियंता अमोल पाचगणे या अधिकाऱ्यांसमवेत कोकणे चौकातील रस्त्याची पाहणी केली. ही वाहतूक कोंडी ही चिंतेची बाब असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना काटे यांनी केल्या आहेत.













