- दिघी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल; सहाजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- जेवन करून फिर्यादीसह त्यांचे दोन मित्र हे त्यांच्या होण्डा अमेज गाडीने परत येत असताना त्यांना समोर ५ ते ६ जणांचा घोळका दिसला. परीसरामध्ये मोबाईल चोरी व इतर गुन्हे होत असल्याने फिर्यादीने तेथे असणा-या लोकांना ‘तुम्ही कशासाठी थांबले आहात’ याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिथे उभ्या असणा-या लोकांना त्याचा राग आला. त्यांनी फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ केली व प्राईड वल्ड सिटीच्या गेटच्या आत निघुन गेले.
फिर्यादीने सिक्युरीटी गार्डला सदरचे इसम कोण आहेत? याबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीस धक्काबुक्की करायला सुरुवात केली. थोडयाच वेळात गेटमधुन १५ ते २० सिक्युरीटी गार्डचा युनिफॉम परिधान केलेले आरोपी हे ५ ते ६ दुचाकीवरून आले. बेकायदा गर्दी जमवुन हातात लोखंडी रॉड, पाईप, बांबु, काठ्या घेवुन फिर्यादीच्या डाव्या हातावर रॉडने मारुन व फिर्यादीचे दोन्ही मित्र यांना लोखंडी रॉड, पाईप, बांबु, काट्यांनी व लाथा बुक्क्यांनी डोक्यात, हातावर पाठीत जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी १.१५ च्या सुमारास प्राईड वल्ड सिटीच्या मेन गेट वरील सेल्स ऑफिससमोर, सिक्युरिटी केबिनजवळ, च-होलीत घडला. या प्रकरणी मंगेश हवय्या मटपती (वय ३५ वर्ष रा. च-होली) यांनी आरोपी विनोद विठठल पाथरुट (वय २६, धंदा-नोकरी, रा. निंबाळकर नगर, लोहगाव), जिवन विठठल पाथरुट (वय-२७, रा. लोहगाव), महींद्र बाबुराव पवार (वय- ३० वर्षे रा लोहगाव), आदित्य राजेश गुप्ता, साहील मोहन मिसाळ, अवनिस दिनेश उपाध्याय यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी २९६/२०२३भा.दं.वि कलम ३०७,३२६.३२३,१४३.१४४,५०४, ५०६ (२) महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) (३) सह१३५.१४४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे.
याउलट परस्पर फिर्याद नोंदविण्यात आली आहे. फिर्यादी विनोद विठ्ठल पाथरुट (रा. लोहगांव) यांनी आरोपी स्वप्निल देवकर, मंगेश मटपती (दोघे रा. प्राईड वर्ल्ड सिटी) व सोबतचा एक अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सिक्युरिटीचे काम करत असलेल्या ठिकाणी भांडणे झाल्याचे आम्हाला समजल्यानंतर आम्ही सदरची भांडणे सोडविण्यासाठी गेलो असता आरोपी यांनी मिळून ‘तुमचा काय संबंध मध्ये बोलण्याचा असे बोलून आम्हाला शिवीगाळ व दमदाटी करत आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीस मारहान करून डावा पाय जखमी केला. तसेच फिर्यादीचा भाऊ याला देखील तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत तसेच सह आरोपी दोघांनी दगड व विटेने तोंडावर व डोक्यात मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस ठाण्यात २९७/२०२३भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह मपोकाकलम ३७ (१) (अ) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














