न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२३) :- पत्ते खेळताना पाहणाऱ्या फिर्यादीला ‘पोलीसांचा खबरी आला बघा’ असे म्हणत आरोपीने बिअरची रिकामी बॉटल डोक्यात पाठीमागे, डाव्या बाजुस जोरात मारली. सह आरोपीने पकडुन हाताने लाथाबुक्याने फिर्यादीला मारहाण केली. त्यामुळे डोक्यात डाव्या बाजुस सुज व फॅक्चर झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही मारहाणीची घटना (दि. ९) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास सुलतान भाभीचा अड्डा, नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर मध्ये घडली.
फिर्यादी ज्ञानेश्वर दशरथ शिंदे यांनी आरोपी वैभव थोरात (पत्ता माहीत नाही), कृष्णा जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३०४ / २०२३ भादवी कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














